पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा अपघातात मृत्यू
पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा हरियाणातील सोनीपतजवळ एका रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. २०२१ च्या लाल किल्ल्यावरील हिंसाचार प्रकरणी त्याला आरोपी म्हणून नाव देण्यात आले होते.
खरखौदा सोनीपत जवळ ही घटना घडली आहे. यामध्ये त्याचे दोन मित्र जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अशी माहिती सोनीपत पोलिसांनी दिली.
करनाल टोलनाक्याजवळ दीप सिद्धू याच्या गाडीची टक्कर एका कंटेनरला झाल्याचे सांगितले जात आहे. दीप हा स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करत होता. दीप सिद्धूचा मृतदेह खरखौदा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला आहे.
सिद्धू हा शेतकरी आंदोलनावेळी प्रकाशझोतात आला होता. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराचा तो प्रमुख आरोपी होता.
Actor-activist Deep Sidhu, accused of being key conspirator of Red Fort violence on Republic Day last year, dies in road accident on Kundli-Manesar-Palwal highway in Haryana's Sonipat: Police
— Press Trust of India (@PTI_News) February 15, 2022