क्राईम बिट

पुणे हादरले ; चक्क मित्राने मित्राला पेट्रोल टाकून पेटवून दिलं..

Share Now

पुण्यातील धनकवडी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शुल्लक कारणावरून मित्राने- मित्राला पेट्रोल अंगावर टाकून पेटवून दिले.

या दुर्घटनेत सुरज विजय मरळ हा २८ वर्षाचा युवक गंभीर जखमी झाला आहे. धनकवडीच्या स्मशानभूमी परिसरामध्ये ही घटना घडली आहे.

सुरज विजय मरळ हा घरून रेडिमेट कपडे विकण्याचे व्यवसाय करतो . ७ मार्च सोमवार मध्यरात्री सुरज आणि सत्येंद्र प्रमोदकुमार यादव यांच्या सोबत आयुष बियरबार या ठिकाणी दारू पिण्यासाठी गेला होता. दारू पिऊन झाल्यानंतर सुरज आणि गोविंदा धनकवडी जवळील स्मशानभूमी या ठिकाणी आपसात चर्चा करत होते. त्याचदरम्यान झालेल्या वादातून आरोपी सत्येंद्र प्रमोद कुमार यादव याने सुरज विजय मरळ याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले .

या घटनेत सुरज मरळ हा जवळपास तो ३० टक्के भाजला आहे. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहकारनगर पोलिसांनी सत्येंद्र प्रमोदकुमार यादव विरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *