क्राईम बिटमहाराष्ट्र

कॅटरिंगच्या नावाने चालत होता नागपुरात ‘या’ प्रसिद्ध हॉटेल मध्ये देहव्यापार आणि अंमली पदार्थ विक्री

Share Now

नागपूर : तरुणींची तस्करी आणि अमली पदार्थ विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . एका ऑडिओ कॉलवरुन पोलिसांना या सर्व प्रकारची माहिती मिळाली. रिंग रोडवरील लक्ष्मी हॉटेलचे मालक आणि आणखीन सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कॅटरिंगच्या व्यवसायाखाली मानवी तस्करी होत असल्याची माहिती या प्रकरणी समोर येत आहे. ओदिशा, मणिपूर व देशाच्या इतर भागात कॅटरिंगच्या व्यवसायात सहभागी असणाऱ्या मुलींच्या माध्यमातून अंमली पदार्थाची तस्करी केली जात होती. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

तसेच देहव्यापार प्रकरणी पोलिसानी चार जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे, याही प्रकरणात कॅटरिंगच्या व्यवसायात असणाऱ्या मुलींना देह व्यापारात बळजबरी ढकललं जात होतं. या दोन्ही प्रकरणात आणखी आरोपी सहभागी आहेत. या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, नागपूर शहरात या दोन्ही प्रकरणावरुन शहरात खळबळ उडाली आहे. शहरात नक्की काय चाललंय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *