प्रियंका आणि निक जोनास झाले आई – बाबा, प्रियांकाने सरोगसीच्या माध्यमातून बाळाला जन्म दिला
प्रियांका चोप्रानं सोशलइंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे त्यात प्रियंकाने आई झाल्याची बातमी दिली . प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या माध्यमातून बाळाला जन्म दिला आहे.
मात्र सध्या त्यांच्या बाळाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. प्रियांकानं आपल्या बाळाचं स्वागत करत असल्याचं तर तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले . परंतु मुलगा आहे की मुलगी हे मात्र तिनं सांगितलेलं नाही. त्यामुळे याबाबत जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
प्रियांका चोप्रानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून आई झाल्याची गोड बातमी सर्वाना दिली . प्रियंकाने लिहिलं कि , ‘आम्ही सरोगसीद्वारे बाळाचं स्वागत केलं आहे, हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे क्षण आमच्यासाठी अतिशय खास आहेत आणि आम्हाला प्रायव्हसीची गरज आहे. कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे. आमच्या भावनांचा आदर कराल अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद.’ आपल्या या पोस्टमध्ये तिनं निक जोनसला टॅग केलं आहे. पण या पोस्टमध्ये तिनं मुलगा की मुलगी हे स्पष्ट केलेलं नाही.
सरोगसी म्हणजे काय ?
ज्या दाम्पत्याला काही कारणांमुळे मूल होऊ शकत नाही त्यांना सरोगसीच्या माध्यमातून मूल प्राप्त होऊ शकतं. काही महिला किंवा पुरुष सक्षम नसल्यामुळे किंवा याआधी अबॉर्शन झाल्यामुळे काही कपल्स मूल जन्माला घालू शकत नाही. मात्र त्यांच्यासमोर सरोगसीचा पर्याय असतो.
https://www.instagram.com/p/CZAJvizvjf4/?utm_source=ig_web_copy_link