महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभांना आजपासून सुरुवात, चार दिवस 9 सभा, एक रोड शो, संपूर्ण वेळापत्रक पाहा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र सभा
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची गडबड सुरु झाली आहे. यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज धुळ्यात पहिली सभा होणार आहे. आज दुपारी 12 वाजता ते धुळ्यात जनतेला संबोधित करतील. यानंतर दुपारी 2 वाजता नाशिकमध्ये त्यांची दुसरी सभा होईल. पंतप्रधान मोदी चार दिवसांत महायुतीच्या उमेदवारांसाठी नऊ प्रचारसभांना संबोधित करतील, त्यात एक रोड शो देखील समाविष्ट आहे.
राज ठाकरे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली, ‘हिंदुत्वाचे वातावरण बिघडवण्याचे आरोप
धुळ्यात सभा
पंतप्रधान मोदींची धुळे येथील सभा मालेगाव रोडवरील गोशाळेच्या मैदानावर होणार आहे. या सभेत उत्तर महाराष्ट्रातील महायुतीचे उमेदवार संबोधित होणार आहेत. धुळे, मालेगाव, जळगाव, आणि नंदुरबार येथील नागरिक मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहणार आहेत.
उपस्थित नेते
या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून अजित पवार गटाने वृत्तपत्रात ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हाची जाहिरात दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रचाराचे वेळापत्रक
भाजपने पंतप्रधान मोदी यांच्या प्रचाराचा कार्यक्रम ठरवला आहे. आज, 8 नोव्हेंबरला, मोदींची पहिली सभा धुळ्यात, 12 वाजता होईल. त्यानंतर 2 वाजता नाशिक येथे दुसरी सभा होईल. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि महायुतीचे इतर नेते उपस्थित असतील.
शनिवारी, 9 नोव्हेंबरला, अकोला आणि नांदेड येथे मोदींची सभा होईल. मंगळवारी, 12 नोव्हेंबरला पुण्यात रोड शो आयोजित केला आहे. त्याआधी मोदी चिमूर आणि सोलापूरमध्ये सभा घेतील. गुरुवार, 14 नोव्हेंबरला, संभाजीनगर, रायगड, आणि मुंबईत प्रचारसभांना पंतप्रधान संबोधित करणार आहेत.
मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
सुरक्षेची तयारी
धुळे शहरातील सभेसाठी 45 एकरावर तयार केलेली भव्य सभा मंडप आणि व्यासपीठाची तयारी केली आहे. 2,500 पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सभेला एक लाख लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील महायुतीला आठ जागांपैकी फक्त दोन जागांवर विजय मिळवता आला होता, त्यामुळे महायुतीचे नेते उत्तर महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करत आहेत.
भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी सुरक्षेचा अतिरेक दिसून येत आहे. अनेक माध्यम प्रतिनिधींना सभेला जाण्यास मज्जाव करण्यात आले आहे. तसेच, काळ्या रंगाची पँट घालणाऱ्यांनाही सभेच्या परिसरात प्रवेश देण्यात आलेला नाही. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे आणि गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Latest: