पंतप्रधान नरेंद्र मोदीची ; मध्यरात्री रेल्वे स्टेशनला भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसीमध्ये दोन दिवसीय दौरा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रोड शो केला. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या शेवटच्या सातव्या टप्प्याच्या आधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी मध्यरात्री अचानक वाराणसी कॅंट रेल्वे स्थानकावर पोहोचले. त्यांनी स्टेशनची पाहणी केली.
स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर चालत त्यांनी प्रवाशांच्या सुविधा आणि स्वच्छतेचा आढावा घेतला. तसेच त्यांनी प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या महिलेच्या पायाला स्पर्श केला. येथून पंतप्रधानांचा ताफा खिडकीया घाटावर पोहोचला. पंतप्रधानांची एक झलक पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
पंतप्रधान मोदींनी वाराणसीमध्ये रोड शो दरम्यान जमलेल्या मोठ्या प्रमाणात गर्दीतून थोडा ब्रेक घेतला आणि चहाचा आस्वाद घेतला. तसेच चहाच्या दुकानात उपस्थित लोकांशी संवाद साधला.
pic credit – AninewsUP
UP | Prime Minister Narendra Modi inspects Varanasi Cantt Railway Station, post his roadshow ahead of the last phase of #UttarPradeshElections2022 pic.twitter.com/RyP0qNZvYL
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 4, 2022