क्राईम बिट

प्रेयसीने असं काय केलं, की प्रियकराने आत्महत्येचं पाऊल उचललं..?

Share Now

प्रेयसी पासून दुरवल्याने प्रियकराने केली आत्महत्या. वर्ध्यातील अनोखी प्रेम कहाणी म्हणायला हरकत नाही, यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर प्रेम करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली आहे. मुलीच्या वडिलांनी आपल्या प्रेयसीला आपल्यापासून दूर नेल्याच्या विरहामुळे या तरुणाने टोकाचे उचलले आहे.
वर्ध्यातील वायगाव येथील सौरभ अनिल मस्के या तरुणाने वायगाव येथील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देत फुस लावून पळून नेले होते. यानंतर मुलीच्या वडिलांनी देवळी पोलीस ठाण्यात सौरभ विरुद्ध तक्रार दिल्याने त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

यानंतर पोलिसांनी या दोघांचा शोध घेऊन अल्पवयीन मुलीला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले आणि आरोपी सौरभ मस्के याच्यावर कलम ३६३ भादवी तसेच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सौरभचा जामीन फेटाळून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. यानंतर आपली शिक्षा पूर्ण करून सौरभ बाहेर आला. यानंतर सौरभ आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गावातच एक पान टपरी घेऊन भाड्याने राहत होता. मात्र या सगळ्या प्रकरणामुळे समाजाकडून मिळणारी वागणूक त्याची जगण्याची मानसिकता खचवणारी होती. यामुळे त्याने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले.

आपली यामुळे समाजात खूप बदनामी झाली आहे. यामुळे त्याने कुटुंबाकडे सुद्धा दुर्लक्ष केलं होते. मंगळवारी सकाळी नेहमी प्रमाणे सौरभने आपली पान टपरी उघडली. दिवसभर व्यवसाय केला परंतु चिंतेत असलेल्या सौरभने रात्री सातच्या सुमारास टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी देवळी पोलिसानी कलम १७४ जा.फो. नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलीस पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *