प्रीपेड दरवाढीची किमया उत्पन्न वाढवण्याची आयडिया
व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलनंतर आता मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओनेही आपले प्रीपेड प्लॅन महाग केले असून, 1 डिसेंबरपासून नवीन दर योजना लागू होणार आहेत. म्हणजेच, जर तुम्हाला जुन्या किमतीत सेवांचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही रिचार्ज करून (३० नोव्हेंबरपर्यंत) जुन्या किमतीचा लाभ घेऊ शकतो .
75 रुपयांच्या Jio प्लॅनसाठी 91 रुपये खर्च करावे लागतील. अमर्यादित प्लॅनबद्दल सांगितलं तर आता 129 रुपयांच्या प्लॅनसाठी 155 रुपये, 149 रुपयांच्या प्लॅनसाठी 179 रुपये, 199 रुपयांच्या प्लॅनसाठी 239 रुपये, 249 रुपयांच्या प्लॅनसाठी 299 रुपये, 399 रुपयांच्या प्लॅनसाठी 479 रुपयांच्या प्लॅनसाठी आता 533 रुपये खर्च करावे लागतील.
329 रुपयांच्या जिओ व्हॅल्यू प्लॅनची किंमत आता 395 रुपये, 555 रुपयांच्या प्लॅनची 666 रुपये, 599 रुपयांच्या प्लॅनची किंमत 719 रुपये, 1299 रुपयांच्या प्लॅनची 1559 रुपये आणि 2399 रुपयांच्या प्लॅनची किंमत 2,879 रुपये आहे. यासाठी पूर्ण 480 खर्च करावे लागतील.
51 रुपयांच्या Jio डेटा व्हाउचरसाठी, आता यूज़र्स 61 रुपये, 101 रुपयांच्या प्लॅनसाठी 121 रुपये आणि 251 रुपयांच्या प्लॅनसाठी 301 रुपये खर्च करावे लागतील.
रिलायन्स जिओने ‘शाश्वत दूरसंचार उद्योग’ बळकट करण्यासाठी किंमती वाढवल्याचं म्हटलं आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया सबस्क्रिप्शन अहवालानुसार, जिओकडे सर्वाधिक वायरलेस ग्राहक आहेत ज्यात 36.43 टक्के मार्केट शेअर आहे. सप्टेंबर २०२१ पर्यंत, जिओचे भारतात ४२४.८३७ दशलक्ष वायरलेस सदस्य झाले.