राजकारण

प्रेमसागर गणवीर यांचे नाना पटोलेवर गंभीर आरोप; ‘उमेदवारी न दिल्यामुळे राजकीय जीवन उद्ध्वस्त

प्रेमसागर गणवीर यांचे नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप; “उमेदवारी न दिल्यामुळे राजकीय जीवन उद्ध्वस्त”
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान भंडारा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रेमसागर गणवीर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे: ‘विरोधकांनी लाडकी बहीण योजनेला अडथळा घातला, पण महिलांना पैसे मिळणारच

माझे राजकीय जीवन उद्धवस्त झाले
प्रेमसागर गणवीर म्हणाले, “मी ३५ वर्षे काँग्रेस पार्टीसाठी निष्ठेने काम केलं, पण नाना पटोले यांनी मला उमेदवारी मिळवून देण्याचे आश्वासन दिलं, मात्र ऐनवेळी मला डावलण्यात आलं. त्यांच्यामुळेच माझं राजकीय जीवन उद्धवस्त झालं.” यावेळी ते ढसाढसा रडले आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी हवी असल्यास करा अर्ज, पगार दरमहा 70,000 रुपये

दलित अस्मितेच्या रक्षणासाठी लढाई
“माझ्या उमेदवारीसाठी तयार होण्यास सांगितलं, पण काँग्रेसचे नेते पक्ष सोडून गेले तरी मी कधीही पक्ष सोडला नाही. आता, दलितांच्या अस्मितेच्या रक्षणासाठी मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहे,” असं प्रेमसागर गणवीर यांनी सांगितलं.

भंडारा विधानसभा: पूजा ठवकर विरुद्ध नरेंद्र भोंडेकर
भंडारा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने पूजा ठवकर यांना उमेदवारी दिली आहे, तर महायुतीकडून नरेंद्र भोंडेकर यांना उमेदवारी मिळाली आहे. यामध्ये अपक्ष उमेदवारांच्या उपस्थितीमुळे थोडासा गोंधळ होण्याची शक्यता आहे, आणि भंडारा मतदारसंघात रोचक लढत पाहायला मिळणार आहे.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *