औरंगाबादेत पोलीस कर्मचाऱ्याचा प्रताप..! लग्नाचं आमिष देत महिलेवर अत्याचार
लग्नानंतर पतीपासून विभक्त झालेल्या एका विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवत फसवण्याचा प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला. या घटनेत महत्त्वाचं म्हणजे एका पोलिस कर्मचाऱ्यांने महिलेवर अत्याचार केले. सुरुवातीला लग्नाचे आमिष दाखवत पतीपासून असलेल्या दोन मुलांना स्विकारून घेईन, असं बोलून पोलीस कर्मचारी आणि पीडित महिला एक वर्ष सोबत होते.
त्यानंतर पीडित महिला गर्भवती राहिल्यानंतर पीडितेने लग्नाची मागणी घातली मात्र त्यावेळी नराधमाने मुलासकट मारून टाकण्याची धमकी दिली संपूर्ण घटना पीडितेने गर्भपात केल्यानंतर समोर आली. आणि महिलेने पोलिसांकडे तक्रार केली आहे.
पीडित महिला लग्नानंतर पतीसोबत होणाऱ्या वादामुळे विभक्ती राहते तिला दोन मुले असून २०२१ मध्ये एका मॉल मध्ये कामाला होती, तेव्हा शिपाई संदीप लक्ष्मण पवार यांच्यासोबत ओळख झाली ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर मुलांचं स्विकारण्याची आमिष दाखवले.
तसेच पीडित महिला व शिपाई जवळपास एक वर्ष सोबत होते. त्या दरम्यान त्याने महिलेची आठ ते दहा लाख रुपयांची आर्थिक फसवणूकही केली आहे. १५ फेब्रुवारी २०२१ ते २९ जानेवारी २०२२ पर्यंत या शिपायाने जबरदस्ती संबंध ठेवले मात्र महिलेने लग्नासाठी मागणी घातल्यानंतर शिपायाने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
२८ ऑगस्ट २०२१ रोजी सहा आठवड्यांची गर्भवती असल्याचे सोनोग्राफी केल्यानंतर समोर आले, तेव्हा पोलीस ठाणे गर्भपात करण्यास आग्रह केला गर्भपात कर नाही तर तुझ्या मुलाला मारून टाकले. अश्या धमकीनंतर महिलेने खासगी रुग्णालयात गर्भपात करून घेतला.
पीडित महिलेवर मारहाणीचा गुन्हा पोलीस पत्नी सिडको पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. पीडित महिला आरोपी पोलिसांच्या घरी पैसे मागण्यासाठी गेली असता तिने पोलीस पत्नीला तिच्या घरात घुसून मारहान केली होती. ही घटना ३ फेब्रुवारी रोजी घडली यानंतर पोलीस शिपायावर अत्याचारांचा गुन्हा छावणी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.