महाराष्ट्र

राज्यात वीज टंचाई ; भारनियमन अटळ

Share Now

वीज टंचाईमुळे राज्यात १,४०० ते १,५०० मेगावॅट विजेचे भारनियमन करावे लागणार असून, नागरिकांनी ते सहन करावे, असे आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. अदानी वीज कंपनीने महावितरणचा वीजपुरवठा बंद केल्याने राज्यावर वीज भारनियमनाचे संकट ओढवले आहे. असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा :- मंत्री धनंजय मुंडे यांना महिलेची पाच कोटींची मागणी, अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करायची धमकी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत कोळशाची उपलब्धता, वीज भारनियमन, ऑक्टोबर महिन्यापर्यंतचे वीज पुरवठ्याचे नियोजन याबाब चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर नितीन राऊत म्हणाले अदानी पॉवर कंपनीने तिरोडा येथील प्रकल्पातून अचानक पुरवठा कमी केला. ३१०० मेगावॅट करार आहे पण पुरवठा १७६५ मेगावॅट केला तसेच त्यांच्याकडून १४०० मेगावॅट वीज कमी मिळाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन
वीज तुटवड्याची स्थिती देशभर आहे. या परिस्थितीत सर्वांनीच वीज बचत करायला हवी. विजेची उधळपट्टी थांबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिले. आवश्यक वीज उपलब्ध व्हावी यासाठी खासगी कंपन्या तसेच अन्य पर्यायी मार्ग बाबतचे नियोजन करण्यात यावे.

नितीन राऊत काय म्हणाले ?
वीज व कोळसा मिळत नसल्यामुळे आम्हाला भारनियमन करावे लागणार आहे. महावितरण आला पंधराशे मेगावॅट वीज मिळाली तर भारनियमन होणार नाही.

हे ही वाचा (Read This)   या पिकाची लागवड करून बाराही महिने कमवा लाखों रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *