चंद्रकांत दादांच्याच मतदार संघात ‘ चंद्रकांत पाटील हरवले आहे’ असे पोस्टर
पुणेरी पाट्यांची गम्मत वेगळीच असते, मात्र या पुणेरी पाट्या, पोस्टर आता राजकीय कारणामुळे चर्चेत आले असून भाजप आणि पुणेकरांतील नाराजगी दाखवत आहेत, कोथरूडमध्ये चक्क आमदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हरवले आहे अशा पाट्या, पोस्टर लावण्यात आल्या आहे, त्यात गेल्या काही महिन्यान पासून चंद्रकांत पाटील हरवले आहे असे लिहिले आहे.
दादा, एक महिना झाला तुमचा शोध कुठेच लागत नाही! तुम्ही जिथे कुठे असाल पार्ट या ! आम्ही तुम्हाला काहीच बोलणार नाही, आणि पुढे समस्त कोथरुडकर असे लिहिले आहे. महत्वाच म्हणजे हे पोस्टर चंद्रकांत पाटलांच्या मतदार संघ असलेल्या कोथरूडमध्ये लावले आहे. मुळात हि पोस्टर कुणी लावली यावर साठ्या चर्चा सुरु आहे. नाराज होऊन कोथरूडच्या नागरिकांडी लावली कि विरोधकांनी? असा प्रश्न सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पुणेरी स्टाईल मध्ये लावलेली हि पोस्टर सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रेमात व्हायरल होत आहे.
दरम्यान कोल्हापूच्या पॉट निवडणुकांचे पडसाद अश्या प्रकारे पुण्यात उमटतांना दिसत आहे. राजकीय स्तरावर देखील या पोस्टरची जोरदार चर्चा सुरु आहे. पुणेरी पोस्टर, पाट्या मधून नेहमी आपण राजकीय स्थितीचा हस्यात्मक आढाव घेताना पुणेकरांना पाहतो, मात्र हे पोस्टर काहीसे वेळेचं आहे.