राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी मतदान, यूपीमध्ये सर्वाधिक जागा रिक्त, जाणून घ्या कोणत्या राज्यात किती जागा
भारत निवडणूक आयोगाने देशातील विविध राज्यांमधून रिक्त राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. १५ राज्यांमध्ये राज्यसभेच्या एकूण ५७ जागा रिक्त आहेत. या ५७ जागांपैकी ११ राज्यसभेचे सदस्य यूपीमधून निवडले जाणार आहेत. निवडणूक आयोगाने गुरुवारी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. यासोबतच या सर्व ५७ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे.
जाणून घ्या कोणत्या राज्यात किती जागा रिक्त आहेत
राज्यसभेसाठी १५ राज्यांमधून ५७ खासदार निवडून येणार आहेत. यापूर्वी या सर्व जागांवर निवडून आलेल्या खासदारांचा कार्यकाळ संपला आहे. महाराष्ट्राच्या सहा जागा रिक्त होणार आहेत. या सहा जागांवरील सद्याचे विद्यमान खासदार हे महाराष्ट्रातील दिग्गज नेते असून . यामध्ये पीयूष गोयल, पी. चिदंबरम, प्रफुल्ल पटेल, विकास महात्मे, संजय राऊत आणि विनय सहस्त्रबुद्धे यांचा समावेश आहे. या सर्व दिग्गज सदस्यांचा कार्यकाळ येत्या 4 जुलैला समाप्त होणार आहे.
आंध्र प्रदेशातील चार आणि छत्तीसगडमधील राज्यसभेच्या दोन जागांवर निवडणूक होणार आहे. मध्य प्रदेशात तीन जागांवर निवडणूक होणार आहे, तर कर्नाटकात चार जागा रिक्त आहेत. ओडिशामध्ये तीन जागा, राजस्थानमध्ये चार, पंजाबमध्ये दोन आणि उत्तराखंडमध्ये एक जागा रिक्त आहे. बिहारमध्येही राज्यसभेच्या पाच जागा रिक्त आहेत. झारखंड आणि हरियाणामध्ये राज्यसभेच्या प्रत्येकी दोन जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत.
आयोगाने कार्यक्रम जाहीर केला
भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणुकीची अधिसूचना २४ मे रोजी जारी केली जाणार आहे. अर्जाची छाननी १ जून, तर अर्ज मागे घेण्याची तारीख ३ जून आहे. सर्व जागांसाठी १० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर होणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर राजकीय पक्षांच्या कार्यालयात पुन्हा निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. यावेळी भाजपला सर्वाधिक जागा मिळतील तर काँग्रेसला सर्वाधिक फटका बसणार आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक राज्यांची सत्ता काँग्रेसच्या हातून निसटली आहे.
ही वाचा (Read This) उन्हाळ्यात ताजेतवाने करणारे पेय: बनवा लिंबू आणि पुदिन्याचे हे थंड पेय, कसे बनवायचे ते जाणून घ्या