राजनीतीकार प्रशांत किशोर राजकारणात का जाणार नाही, स्वतः दिले स्पष्टीकरण
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी गेल्या काही दिवसापासून येत होती. प्रशांत किशोर यांनी पक्षाला उभारी देण्यासाठी काही प्लॅन देखील सांगितले होते. त्यानंतर किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तूळातून व्यक्त केली जात होती. मात्र, आता सुरजेवाल यांच्या ट्वीटनंतर यावर पूर्ण विरामा लागला असून, प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रशांत किशोर यांनी ट्वीटच्या माध्यमातून माहिती दिली की, मी EAG चा भाग म्हणून काँग्रेस पक्षात सामील होण्यासाठी आणि निवडणुकीची जबाबदारी घेण्याची ऑफर नाकारली आहे. तसेच परिवर्तनात्मक सुधारणांद्वारे खोलवर रुजलेल्या संरचनात्मक समस्यांचे निराकरण करण्यासाठी पक्षाला माझ्यापेक्षा अधिक नेतृत्वाची आणि सामूहिक इच्छाशक्तीची गरज असल्याचे सांगितले आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिले होते. परंतु , किशोर यांच्या पक्ष प्रवेशाबाबत नेत्यांचे वेगवेगळे मतं होेते. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम लागला असून, भारतीय राजकीय कृती समितीने तेलंगणा राष्ट्र समितीसोबत केलेली युतीवरून प्रशांत किशोर आणि काँग्रेसमधील चर्चा निष्फळ बोलणी तुटण्याचे महत्त्वाचे कारण असल्याचे मानले जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये सामील करून घेण्यासाठी आणि 2024 च्या मिशनचे त्यांचे प्रस्तावित व्हिजन पुढे नेण्यासाठी विचार करण्यासाठी समिती स्थापन केली होती. या 13 सदस्यीय समितीने आपला अहवाल काँग्रेस अध्यक्षांना सादर केला. यासंदर्भात सोमवारी काँग्रेस नेत्यांची बैठकही झाली. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेते प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये आणण्याच्या बाजूने होते, मात्र दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी याबाबत भीती व्यक्त केली होती.