राजकीय बातमी कल्याण पश्चिम मतदारसंघ:- प्रचारात अति उत्साहाचा धोका; उमेदवाराच्या केसांना लागली आग
राजकीय बातमी कल्याण पश्चिम मतदारसंघ :- प्रचाराच्या वेळी उमेदवाराच्या डोक्यावर आग
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात सध्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात असलेल्या जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार राकेश मुथा यांच्या प्रचाराच्या वेळी मोठी दुर्घटना घडली आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भोईरवाडी परिसरात त्यांना ऐतिहासिक स्वागतासाठी तयार करण्यात आलेल्या भव्य हारासोबत फटाके लावले होते. या फटाक्यांच्या ठिणग्या राकेश मुथा यांच्या डोक्यावर उडाल्या आणि त्यांचे केस पेटले.
मनोज जरांगेचा मतदारांना ‘हा’ सल्ला
घटना घडली तशी कार्यकर्त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत आग विझवली, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण प्रचाराच्या वेळी कार्यकर्त्यांचा अति उत्साह कधी कधी धोका निर्माण करू शकतो, याचा प्रत्यक्ष अनुभव यामुळे मिळाला.
Exclusive: Ground Report & Analysis मध्य -छत्रपती संभाजीनगर!
कल्याण पश्चिममधील तिन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेच्या दोन गटांमध्ये, शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट, तसेच मनसेचे उमेदवार उल्हास भोईर यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून सचिन बासरे आणि शिंदे गटाकडून विश्वनाथ भोईर हे रिंगणात उतरले आहेत. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात या तीन पक्षांमध्ये तीव्र संघर्ष असून, कल्याण पश्चिममधील निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.
निवडणुकीच्या प्रचारामध्ये उमेदवारांचा उत्साह हा स्थानिक व राजकीय वातावरणात महत्त्वपूर्ण ठरणार आहे, आणि कल्याण पश्चिममधील कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Latest:
- 750 रुपयांच्या डोसने गाय, म्हैस, वासरू देतील जन्माला ! हे तंत्रज्ञान पशुपालकांसाठी आहे वरदान, वाचा सविस्तर
- तेलबिया अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मिळणार मोफत बियाणे, २१ राज्यांतील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याची तयारी
- ‘भारत’ ब्रँडचा तांदूळ, पीठ आणि डाळींची विक्री पुन्हा सुरू, यावेळी एवढी असेल किंमत
- ICAR ने रब्बीमध्ये HD3388 गव्हाच्या नवीन जातीची पेरणी करण्याचा सल्ला दिला, शेतकऱ्यांना 125 दिवसांत 52 क्विंटल उत्पादन मिळेल.