राज्यातील दोन शहरात पोलिसांवर गावगुंडाकडून हल्ला
राज्यात दोन शहरात पोलिसांवर हल्ला झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यात डीजेला विरोध केल्याच्या कारणाने पोलीस ठाण्यावर गाव गुंडांकडून हल्ला झाला तर उस्मानाबादमध्ये कत्तलखान्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीसावर गावगुंडाकडून हल्ला झाला आहे. सामान्य माणसंच रक्षण करणारे पोलिसच सुरक्षित नाही असे या घटनेतून सिद्ध होतंय.
शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये काल मध्यरात्रीच्या वेळी हल्लेखोरांनी पोलीस स्टेशन मध्ये सुमारे एक दीडच्या सुमारास वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या आवाजात डीजे पार्टी सुरू असल्याची तक्रार शेगाव पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले डीजे बंद करण्यास सांगितल्यानंतर अज्ञातांनी पोलीस स्टेशनवर हल्ला केला. या घटनेत पोलिसांनी आठ ते दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांवर हल्ला होणारी दुसरी घटना उस्मानाबाद शहरात घडली. अवैद्य कत्तलखान्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर गाव गुंडांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले, पोलीस समाधान नवले यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे तसेच बबन जाधव हे देखील जखमी झाले.