पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा रोखला ?
पंतप्रधान हुसैनीवाला येथे जाण्यास निघाल्यानंतर शहीद स्मारकाच्या सुमारे ३० किलोमीटर अलीकडे पंतप्रधानांचा ताफा थांबवावा लागला. तेथील एका उड्डाणपुलाजवळ १५ ते २० मिनिटे पंतप्रधानांचा ताफा एकाच ठिकाणी थांबून होता. काही निदर्शकांनी रस्ता रोखल्याचे आढळून आले. फिरोजपूर येथे पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन होणार होते. त्यासाठी पंतप्रधान पंजाबमध्ये दाखलही झाले होते. मात्र अचानक दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान माघारी परतले. पाऊस आणि खराब हवामान यामुळे पंतप्रधानांनी फिरोजपूर दौरा रद्द केला असे प्रथम सांगितले जात होते.
आता केंद्रीय गृहमंत्रालयाकडून याबाबत नेमकी माहिती देण्या त आली असून सुरक्षा व्यवस्थेच्या कारणास्तव पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘पंतप्रधान मोदी आज आपल्या नियोजित फिरोजपूर दौऱ्यासाठी रवाना झाले. बठिंडा येथे दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारक येथे जाऊन अभिवादन करणार होते. तिथे हेलिकॉप्टरने जाण्याचे नियोजन होते. मात्र परिसरात पाऊस असल्याने व कमी दृष्यमानता असल्याने पेच निर्माण झाला. साधारण वीस मिनिटे तिथे पंतप्रधानांनी प्रतीक्षा केली.
त्यानंतर रस्तेमार्गाने हुसैनीवाला येथे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. रस्त्याने साधारण दोन तासांचे हे अंतर होते. या अनुषंगाने सुरक्षा व्यवस्था ठेवण्याबाबत लगेचच पंजाबच्या पोलीस महासंचालकांना अवगत करण्यात आले. पंतप्रधान हुसैनीवाला येथे जाण्यास निघाल्यानंतर शहीद स्मारकाच्या सुमारे ३० किलोमीटर अलीकडे पंतप्रधानांचा ताफा थांबवावा लागला. तेथील एका उड्डाणपुलाजवळ १५ ते २० मिनिटे पंतप्रधानांचा ताफा एकाच ठिकाणी थांबून होता. काही निदर्शकांनी रस्ता रोखल्याचे आढळून आले. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही गंभीर चूक लक्षात घेत तातडीने तिथून बठिंडा येथे परतण्याचा निर्णय घेण्यात आला’, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने नमूद केले आहे.