देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले ” मी जिवंत पोहोचलो यासाठी तुमच्या मुख्यमंत्र्यांना आभार सांगा”

Share Now

आंदोलकांनी रस्ता अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना माघारी परतावे लागले. वीस मिनिटे ते एक उड्डाणपुलावर अडकले. नंतर मोदी हे विमानतळावर परतले. भटिंडा विमान तळावर पोहोचताच त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. सुरक्षेत मोठी त्रूट राहिल्याने पंजाबमधील रॅली रद्द करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे प्रचारसभा होणार होती. सकाळी पंतप्रधान मोदी भटिंडा येथे पोहोचले, तेथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. परंतु पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे २० मिनिटे वाट पाहिली. हवामानात सुधारणा न झाल्याने त्यांनी रस्त्याने जाण्याचा निर्णय झाला आणि तसे राज्य सरकारला कळवले गेले. रस्त्याचा प्रवास दोन तासांचा होता.
गृह मंत्रालयाने सांगितले की, डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी करण्यात आली होती. यानंतर पंतप्रधान रस्त्याने प्रवास करण्यासाठी निघाले. हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे ३० किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले. त्यात पंतप्रधान मोदींना १५-२० मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून राहावे लागल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी त्रुटी होती.
आंदोलकांनी ताफा अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ ते २० मिनिटं उड्डाणपूलावरच अडकले होते. याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत असून भाजपा नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीही भटिंडा विमानतळावर पोहोचले असून त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भटिंडा विमानतळावर पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेथील कर्मचाऱ्यांना तुमच्या मुख्यमंत्र्यांचे मी जिवंत पोहोचलो यासाठी आभार सांगा असं सांगितलं. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. मोदी विमानतळावरील कर्मचाऱ्यांना म्हणाले की, “तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, की मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचू शकलो”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *