राजकारण

पंतप्रधान मोदींची अकोल्यात सभा: कापूस शेतकऱ्यांसाठी टेक्सटाईल पार्क, सिंचन प्रकल्प आणि पाणी योजनांची घोषणा

पंतप्रधान मोदींचा अकोल्यातील प्रचार सभेत कापूस शेतकऱ्यांसाठी टेक्सटाईल पार्क, सिंचन आणि पाणी योजनांचा जोरदार उल्लेख

अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोल्यातील निवडणूक प्रचारसभेत कापूस शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वाची घोषणं केली. “अकोला कापूस उत्पादनासाठी ओळखला जातो. कापूस टेक्सटाईल इंडस्ट्रीचा मोठा आधार आहे, पण गेल्या अनेक दशकांमध्ये कापूस शेतकऱ्याला याचा पुरेसा फायदा मिळाला नाही. आता ही परिस्थिती बदलत आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही उद्योग आणि इन्फ्रास्ट्रक्चर दोन्हीला प्रोत्साहन दिलं जात आहे,” असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री शिंदे यांचे परभणीमध्ये जोरदार प्रचार, लाडकी बहीण योजनेवर ठाम भूमिका आणि विरोधकांवर हल्ला

मोदी यांनी महाराष्ट्रात टेक्सटाईल पार्कची पायाभरणी केली असल्याचे सांगून, या पार्कच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी समृद्धीच्या नवीन संधी निर्माण होणार असल्याचं म्हटलं. “काँग्रेसचे सरकार इतकी वर्षे महाराष्ट्रात होतं, पण विदर्भातील पाणी संकट, शेतकऱ्यांचे दुर्लक्ष आणि त्यांचे हित वजा असणाऱ्या योजनांना थांबवण्यात आले. महायुती सरकार आल्यानंतर सिंचनासह विविध योजनांना गती मिळाली,” असंही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींची अकोले येथे प्रचारसभा: राम मंदिर, इन्फ्रास्ट्रक्चर आणि गरीबांच्या घरांसाठी महत्वाकांक्षी योजना

यावेळी मोदींनी पाणी योजनांवर लक्ष केंद्रीत करत सांगितलं, “वैनगंगा, नलगंगा आणि पैनगंगा या नद्या जोडण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर आणि वर्धा येथील पाण्याची समस्या दूर होईल. यासाठी 90 हजार कोटी रुपये खर्च केले जातील,” असे त्यांनी सांगितलं.

आताच्या सरकारच्या उद्दिष्टांचा उल्लेख करत मोदींनी सांगितलं, “पूर आणि दुष्काळ समस्यांसाठी आमच्या सरकारने हजारो कोटी रुपये दिले आहेत. आम्ही शेतकऱ्यांना कमी पाणी वापरण्याचे आवाहन करत असताना, सिंचनासाठी प्रोत्साहन देखील देत आहोत. आमचा संकल्प आहे की, शेतकऱ्यांनी इतकं सशक्त झालं पाहिजे की ते देशाच्या प्रगतीचे नायक बनतील.”

“खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे, आणि आम्ही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत,” असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *