क्राईम बिटमहाराष्ट्र

संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे ‘या’ नावे करण्यात आले फोन टॅपिंग

Share Now

शिवसेना खासदार संजय राऊत तसेच राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. फोन टॅपिंग प्रकरणात अडचणीत सापडलेल्या रश्मी शुकला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून चौकशीत फोन टॅपिंग करताना बोगस नाव वापरल्याचे समोर आले. फोन टॅपिंग करताना संजय राऊत यांच्या नावावर ऐवजी रहाटे आणि एकनाथ खडसे यांच्या नावाने ऐवजी खडासने अश्या नावांचा वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा :- औरंगाबादजवळ रेल्वेवर दरोडा ; या महिन्यातील दरोड्याची ही तिसरी घटना

या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सी आर पी सी कलम 164 अंतर्गत सहा बड्या अधिकाऱ्यांची चौकशी केली यामध्ये एसीएस होम आणि डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असू शकतो. त्याचबरोबर दोघांपैकी जे डी वाय एस पी आहेत. त्यावेळी SID मध्ये कर्तव्यावर होते. त्यांना या फोन टॅपिंग प्रकरणातची माहिती असल्याचे सूत्रांनी सांगितले. संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांच्या फोन टपिंगच्या वेळी बोगस नावांचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा :- राज्यात वीज टंचाई ; भारनियमन अटळ

एफआयआरनुसार, शुक्ला हे एसआयडीचे प्रमुख असताना शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्यात आले होते. तपासादरम्यान पोलिसांना संजय राऊत यांचा फोन ६० दिवस टॅपिंगवर ठेवल्याची माहिती समोर आली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा फोन ६७ दिवस टॅपिंगवर ठेवण्यात आला होता.

हेही वाचा :- मंत्री धनंजय मुंडे यांना महिलेची पाच कोटींची मागणी, अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करायची धमकी

हे ही वाचा (Read This)   या पिकाची लागवड करून बाराही महिने कमवा लाखों रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *