राज्यात ‘शक्ती कायदा’ लागू होण्याचा मार्ग मोकळा

महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी फाशीसारख्या कठोर शिक्षेची तरतूद असलेला ‘शक्ती’ कायदा महाराष्ट्रात लागू करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

राष्ट्रपती रामनाथकोविद यांनी या बहुप्रतीक्षित शक्ती विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही माहिती दिली.

“बहुप्रतीक्षित शक्ती विधेयकावर राष्ट्रपतींची सही झाली असून राज्यामध्ये ‘शक्ती कायदा’ लागू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्राने टाकलेले हे पाऊल निश्चितच आश्वासक असून हा कायदा समस्त महिलांसाठी शक्ती सुरक्षा कवच ठरणार आहे याबद्दल कोणतीही शंका नाही. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मनःपूर्वक आभार.” असं ट्वीट करत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील याबाबत माहिती दिली.

महाविकास आघाडी सरकारने शक्ती विधेयक मंजूर केल्यानंतर राज्यपालांकडे पाठवले होते. ‘शक्ती’ कायदा डिसेंबंर विधानसभेत सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपाच्या आमदारांनी एकमताने मंजूर केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *