“पत्रकारितेचा” एक ‘दुवा’
काल सायंकाळी प्रवासात असताना हे वृत्त समोर आले…आणि जतन केलेला जुना चलचित्र पट झटकन उलगडत गेला…टिव्ही चॅनल पत्रकारितेतील ही बेजोड पर्सनॅलिटी.
दूरदर्शनवर चे ‘परख’, ‘जनवाणी’ सारखे कार्यक्रम
अजूनही आठवणीत आहेत. कधीकाळी प्रणव राॅय सोबतचे निवडणूक विश्लेषण..तासंतास बघताना उठून चॅनल बंद करावं वाटलं नाही. अभ्यास आणि आपल्या प्रत्येक शब्दाचा विचार करूनच वापर. कधी शालिनता, सभ्यता सोडली नाही की कोणतीही भंपकबाजी नाही. टीव्हीवरचा संवाद बघताना दुवा हे प्रत्यक्ष समोर आहेत इतकी सहजता आणि भाषेवरचं प्रभुत्व.
स्कीन मॅनर्सही शिकावेत ते त्यांच्याकडूनच. या छोट्या पडद्याचीही एका अचारसंहिता असते. ती असावी तर विनोद दुवा आणि राॅय यांच्या on screen वर्तणुकीप्रमाणे असं वाटत राहतं. एकदाच १९९९ मध्ये भेटीचा योग आला होता. तोच काय तो प्रत्यक्ष परिचय. चॅनल पत्रकारितेचा एक आदर्श सादरकर्ता ठरलेले दुवा नवीन पिढीला कदाचित रूचणार नाहीत..आक्रमक आणि बन चुके यांना तर ते चालणारही नाहीत…म्हणूनच कालौघात ते बाजूला पडत गेले…निर्भिड राहिलेला पत्रकार आणि सत्ते विरोधात- पक्ष भेद न करता व्यक्त होणारा पत्रकार हा आजच्या जमान्यात outdated आहे. इथे कुणाची तरी तळी उचलावीच लागते. चॅनलस बघताना तर आता अमुक पक्षाचं आहे असं लेबल लागत येतं. अशावेळी दुवा यांचं जाणं..
हे “पत्रकारितेचा” एक दुवा निखळल्याचं चिन्ह आहे.
श्रद्धांजली !