पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे याना धमकी
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना काल व्हाट्स अँपवर एका अनोळखी तरुणाने जीवे मारण्याची धमकी दिली होती. या एका संदेशाने खळबळ उडाली नेमकं धमकी देणाऱ्या तरुणाला बंगळुरु येथे सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
धमकी देणाऱ्या तरुणाने व्हाट्स अँप संदेशात सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूबाबत आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. या घडलेल्या घटनेचा आज अधिवेशनात चर्चेचा विषय झाला असून या प्रकरणी आमदारांनी निषेध नोंदवून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व्हॉट्सअॅपद्वारे धमकी देण्यात आली. मुंबई पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातू अटक केली आहे. जो आरोपी कर्नाटक मध्ये सापडला त्यावरुन अनेक तर्कवितर्क सगळ्यांच्या मनात येऊ शकतात. याआधी दाभोलकर, पानसरे यांची हत्या करणाऱ्यारे कर्नाटकशी संबंधित होते. तेव्हापासून कर्नाटकमध्ये भाजपाचे सरकार आहे म्हणून की काय यांच्यामागे कोणती संस्था आहे याची माहिती मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकारची दिली जाणारी धमकी आणि आरोपी यांचे सगळ्यांचे संबंध कर्नाटकाशी का आहेत याची माहिती मिळणे आवश्यक आहे. आदित्य ठाकरेंना धमकी देणारा आरोपी हा देखील कर्नाटकातील असल्याने हे जाणीवपूर्वक केलेल षडयंत्र आहे का? जर असे असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे,” असे शिवसेना आमदार सुनील प्रभू म्हणाले.