पोलीस चौकीतच ओली पार्टी ; पोलिसांनी तक्रारदारालाच केली मारहाण

पोलीस चौकीतच ओली पार्टी करत तक्रारदाराला मारहाण करणाऱ्या ४ पोलिसांवर कारवाई करण्यात आली. आमदार हिरे यांनी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्यासमोर मद्यपी पोलिसांची तक्रार केली. त्यांनी पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आलेल्या तक्रारदाराला चुकीची वागणूक दिली, याची संपूर्ण माहिती दिली . त्यानंतर आयुक्तांनी इतर चौक्यांचाही आढावा घेऊन तेथील काम ठीक नसेल, तर त्या बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच , एकीकडे जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र थांबताना दिसत नाही. गेल्या दोन महिन्यांत तर लागोपाठ दरोडे पडले. याआधी झालेले खून यामुळे नाशिकमध्ये गुन्हेगारीत होणारी वाढ होत असल्याचे दिसत आहे.

गंगापूर पोलीस ठाण्याच्या दादाजो कोंडदेव पोलीस चौकीत एक तक्रारदार तक्रार करण्यासाठी गेला . काही टवाळखोर दारू पिऊन त्रास देत असल्याची त्यांची तक्रार होती . मात्र, ते तक्रारदार ज्यांच्याकडे गेले, ते पोलिसच टेबलवर बाटल्या मांडून प्यायला बसलेले होते . याचा तक्रारदाराला पहिला धक्का बसला. त्याने पोलिसांचा कारनामा मोबाइलमध्ये शूट केला. तेव्हा पोलिसांनी त्यांनाच मारहाण केली. हा प्रकार पाहून परिसरातले नागरिक जमा झाले. तेव्हा वरिष्ठ पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *