मुसळधार पावसामुळे मुंबईत इमारतीचा काही भाग कोसळला, वृद्ध महिलेचा मृत्यू, 3 जखमी.

महाराष्ट्र मुंबई इमारत कोसळली : मुंबईत मुसळधार पावसात ग्रँट रोडवर एक अपघात झाला. ग्रँट रोड येथे जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे तर 3 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. यानंतर बचावकार्य सुरू झाले. दरम्यान, इमारतीत अडकलेल्या सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

रुबिनिसा मंझिल ही ग्रँड रोड स्टेशनच्या बाहेरची इमारत आहे. सकाळी 11 वाजता या इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याचा काही भाग कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. या इमारतीत 20 ते 22 नागरिक अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आणि त्यांची सुटका केली. रुबिनिसा ही ग्रँट रोड (पश्चिम) येथील रेल्वे स्टेशनजवळ चार मजली इमारत आहे. ही जुनी इमारत आहे. या इमारतीचा काही भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.

काय आहे RBI ची रिसर्च इंटर्नशिप योजना? ज्यामध्ये मिळतील 35 हजार रुपये, घ्या जाणून.

पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून
मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसत आहे. वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. रस्ते वाहतुकीसह लोकल सेवा उशिराने धावत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे.

विशाळगडावरील घटना सरकारचंमोठं फेल्युअर’ असल्याचं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

मुंबईसाठी यलो अलर्ट जारी
दरम्यान, राजधानी मुंबईत आज (२० जुलै रोजी) पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. त्यामुळे सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर पाणी साचले होते. सकाळी अंधेरीमध्ये भुयारी मार्गात पाच फूट पाणी भरले होते त्यामुळे भुयारी मार्ग बंद करावा लागला.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *