क्राईम बिट

फी न भरल्याने पेपर हिसकावला, विद्यार्थ्यानं केली आत्महत्या

Share Now

अमरावतीत एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. अमरावतीतील वसुधाताई देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातील बी.टेक अंतिम वर्षात हा  विध्यार्थी शिकत होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री वसुधाताई देशमुख यांच्या संस्थेतर्फे हे महाविद्यालय चालवले जाते. अनिकेत अशोक निरगुडवार असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचं नाव असून तो यवतमाळ जिल्ह्यातील आहे. अनिकेतनं फी न भरल्याने महाविद्यालयाने परीक्षेला परवानगी नाकारली आणि पेपर हिसकावून घेतला. त्यामुळे अनिकेतने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

फी भरण्यासाठी शिक्षक तगादा लावत असून फी भर अन्यथा शिक्षण सोड अशा शब्दात आपला अपमान केला जात असल्याची माहिती अनिकेतने आत्महत्येपूर्वी दिली होती असं अनिकेतच्या बहिणीने सांगितले आहे. विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात तक्रार दिली असून त्यांची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून आत्महत्येचे नेमके कारण तपासानंतर समोर येईल अशी प्रतिक्रिया बडनेरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *