पाण्या ऐवजी थुंकीचा वापर प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबचं अजब कृत्य
उत्तर प्रदेशातील बागपत येथे राहणाऱ्या ब्युटी पार्लर ऑपरेटरने भारतातील टॉप हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब याने डोक्यावर थुंकल्याचा आरोप केला आहे.
प्रसिद्ध आणि सेलिब्रिटींचे आवडते हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये तो एका महिलेच्या डोक्यावर थुंकताना दिसतंय एवढेच नाही तर व्हायरल व्हिडिओमध्ये जावेद हबीब या थुंकीत जीव आहे असे म्हणताना ऐकू येत आहे. जावेद हबीबने थुंकून केस कापण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महिलेने केला आहे .
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जावेद हबीब एका कार्यक्रमादरम्यान एका महिलेच्या केसात थुंकताना दिसत आहेत.एवढेच नाही तर या थुंकीत जीव असल्याचेही तो म्हणतो. असे म्हणताच तेथे उपस्थित सर्व लोक हसू लागले. पीडित महिलेने या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त करत विडिओ शूट केलाय.
जावेद हबीबवर आरोप करणाऱ्या महिलेचे नाव पूजा गुप्ता असून, ती व्हिडिओमध्ये स्वत:ला बरौत येथील रहिवासी असल्याचे सांगतेय. व्हिडिओमध्ये ती म्हणते, ‘माझे नाव पूजा गुप्ता, आणि माझे वंशिका ब्युटी पार्लर नावाचे पार्लर असून मी बरौतची आहे. मी काल जावेद हबीब याच्या सेमिनारला गेले होते ज्यात त्यांनी मला केस कापण्यासाठी स्टेजवर बोलावले आणि त्यांनी थुंकण्याचा हा प्रकार केला आहे . जर तुमच्याकडे पाणी नसेल तर थुंकीने केसही कापता येतात, हे त्यांनी दाखवून दिले.
त्यामुळे मी माझे केस कापले नाहीत. मी माझे केस कोणत्याही गल्लीच्या पार्लरमध्ये कापून घेईन, पण जावेद हबीबकडे केस कापून घेणार नाही.
जावेद हबीबच्या या थुंकल्याच्या प्रकणावरून जावेद हबीब वर सर्व स्तरावरून टीकेचे झोड उठेल आहे.