पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण.
भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे. यावेळी त्यांना करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली आहे. त्यांना सौम्य लक्षणं असल्याचे निदर्शनास आले, पंकजा मुंडे आपल्या मुंबईतील घरीच क्वारंटाईन झाल्या असून तेथेच त्यांच्यावर उपचार घेत आहेत.
पंकजा मुंडे यांनी स्वतः कोरोनाची लागण झाल्याची माहिती आपल्या ट्विटर वरून दिली, त्या म्हणाल्या, “करोना बाधित लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग झाले आहे. चाचणी केली. लक्षणं आणि करोना दोन्ही आहेत. सर्वांनी काळजी घ्यावी.”
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. आपण पंकजा यांना मेसेज करून काळजी घेण्यास सांगितल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
राजकीय व्यासपीठावर एकमेकांवर कठोर शब्दात टीका करत असताना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे, परंतु भाऊ बहिणीच्या नात्यातील आपुलकी अश्या प्रसंगातुन पुन्हा एकदा राज्याने बघितली आहे.
पंकजा मुंडे यांना कॉल करू शकलो नाही, मात्र मेसेजद्वारे सांगितलं की तुला दुसऱ्यांदा करोना झाला आहे. करोना काळात काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. विशेषतः पोस्ट कोविड त्रास जास्त असतो. अशावेळी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मी तिला मेसेज केला की काळजी घेतली पाहिजे.