“पालघर: विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार का बनला जीवघेण्या संकटाचे कारण?”
“पालघर: विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार का बनला जीवघेण्या संकटाचे कारण?”
पालघरमधील शाळांमध्ये पोषण आहाराच्या नावाखाली जिवाशी खेळ, अळ्या आणि बुरशी आढळल्याने संताप
पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये अळ्या, बुरशी आणि झुरळ आढळल्याने पालकांमध्ये मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना दिला जात असलेला मिलेट न्यूट्रेटिव्ह बार फूडमध्ये जिवंत अळ्या आणि बुरशी दिसून आल्या आहेत.
विनायक चतुर्थी: 4 किंवा 5 डिसेंबर? जाणून घ्या कधी आहे!
शालेय पोषण आहाराच्या या घटनेने मोठा विवाद निर्माण केला असून, पालघर जिल्ह्यातील आनंद लक्ष्मण चांदावरकर विद्यालय खानिवली आणि चिंचणी जिल्हा परिषद शाळा-३ या शाळांमध्ये ही घटना घडली आहे. २ लाख ७५ हजार १९१ विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळला जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या आहाराचा ठेका इंडो अलायड प्रोटीन फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे दिला आहे.
महायुतीची पत्रकार परिषद | मुंबई |
तक्रारी असूनही प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या शाळांमधील मुलं गरीब आणि आदिवासी बहुल भागातील आहेत, ज्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात येत आहे. अशा घटनेवर कठोर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे. शालेय पोषण आहाराच्या या गंभीर आणि धक्कादायक घटनेने शाळांच्या पोषण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.