पक्ष स्थापनेच्या वर्धापनदिनी काँग्रेसचा ध्वज खाली
भारतातील राष्ट्रीय राजकीय पक्ष असलेला काँग्रेस पक्ष आज १३७ वा स्थापना दिन साजरा करत आहे. त्यानिमित्त दिल्लीतील मुख्यालयासह काँग्रेसच्या विविध कार्यालयांत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या दिल्लीतील कार्यालयात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याहस्ते ध्वजवंदन होत असताना ध्वजस्तंभावरून ध्वज खाली पडला. मात्र सोनिया गांधी यांनी प्रसंगावधान राखत ध्वज हातात पकडला आणि पक्ष ध्वजाचा मान राखला.
हा झेंडा योग्य प्रकारे बांधला न गेल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर सोनिया गांधी यांनी हातातच झेंडा फडकवला.
#WATCH दिल्ली: भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के 137वें स्थापना दिवस के अवसर पर कांग्रेस की अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी द्वारा अखिल भारतीय कांग्रेस कार्यालय में कांग्रेस का झंडा फहराने के दौरान झंडा नीचे गिर गया। pic.twitter.com/ZeA6z6ycNK
— ANI_HindiNews (@AHindinews) December 28, 2021