महाराष्ट्र

पैठणच्या संत विद्यापीठाची संथ सुरुवात जाणून घ्या कसे असणार हे विद्यापीठ !

Share Now

हो नाही करता करता अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पैठण संत विद्यापीठ अस्तित्वात येणार हे नक्की झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच औरंगाबादेत याची घोषणा केली आणि कार्यारंभही झाला. यामुळे प्रदीर्घ प्रतीक्षा संपली आणि महाराष्ट्राच्या भूमीतील संतांच्या कार्याला शैक्षणिक दृष्ट्या – शास्त्रीय अभ्यासातून उजाळा देणारा हा प्रकल्प आता सुरु होतोय ही समाधानाची बाब आहे. एक वर्षांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पैठण येथील संथपीठाची पाहणी करून जानेवारी २०२१ पर्यंत चालू करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी देखील केली होती. परंतु विलंब होत होत अखेर सुरुवात झाली.

असा आहे अभ्यासक्रम :
संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपविण्याची सुचना ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यासंबंधीचा शासननिर्णय देखील काढला आहे. या निर्णयानुसार विविध प्रमाणपत्र, पदविका,पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांना आवश्यक त्या प्राधिकरणाची मान्यता घ्यावी लागेल. निरनिराळ्या संप्रदायांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यास घटकांची निवड करून अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यात येणार आहे. . संतपीठाच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रत्येक संप्रदायाच्या अभ्यासक्रमांना योग्य ते स्थान देण्यात येणार आहे.
पैठण येथील संतपीठामध्ये सध्या पन्नास वर्गखोल्या आहेत. त्यात ग्रंथालय तसेच शंभर विध्यार्थ्यांना साठी वसतिगृह आहे. या संत पीठात संत साहीत्य, संतांचे कार्य आणि राष्ट्रीय एकात्मता याच शिक्षण देतात. भविष्यात जेव्हा केव्हा संतपीठाचे विद्यापिठ होईल यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत अभ्यासक्रम ठरवून पदवी आणि पद्युततर शिक्षण घेता येणार आहे. या संतपीठामध्ये भारतीय परंपरा संस्कृती, सामाजिक मूल्य संस्कार आणि संगीतावर आधारित अभ्यासक्रम असणार आहे. त्यात काही सहा महिने आणि एक वर्ष कालावधीचे प्रमाणपत्र कोर्सेस असणार आहे.
• तुकाराम गाथा परिचय याचा कालावधी सहा महिने असेल.
• ज्ञानेश्वरी परिचय या कोर्सचा कालावधी सहा महिने असेल.
• एकनाथी भागवत परिचय पत्र या कोर्सचा कालावधी सहा महिने असणार आहे.
• वारकरी कीर्तन हा कोर्स मात्र एक वर्ष कालावधीचा आहे.
विद्यार्थ्यांच्या मागणी नुसार आणखी अभ्यासक्रम वाढवण्यात येणार आहे.

तयार करण्यात आलेले अभ्यासक्रम चालवण्याची जबाबदारी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची असणार आहे. गरजेनुसार तज्ज्ञ व्यक्तींची मानधन किंवा तासिका तत्वावर तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती कंत्राटी स्वरूपात बाह्य स्त्रोतामार्फत करता येऊ शकेल. यासाठीचा खर्च विद्यापीठाला स्व निधीतून करावा लागणार असून संतपीठाच्या जागेची तसेच इमारतीची मालकी तूर्तास शासनाकडे राहील. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शासनाच्या या मालमत्तेचा केवळ वापर करणार असून शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी ही इमारत विद्यापीठाकडे राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *