पाच कोटींचा एक घोडा, मालक म्हणतो विकणार नाही
*पाच कोटींचा एक घोडा*
*मालक म्हणतो विकणार नाही*
एका घोड्याची किंमत पाच कोटी आहे, त्याचे कारणही तसेच आणि घोड्याचे गुणही तसे. कोणत्या जातीचा आहे हा घोडा ? एवढी किंमत मिळूनही मालकाने का दिला नकार विकायला ? जाणून घ्या ..
महाराष्ट्रातील सारंगखेड यात्रा प्रख्यात आहे, या यात्रेची प्रसिद्धी झाली ती येथील घोड्यांच्या खरेदी-विक्री बाजाराने. दरवर्षी अनेक सशक्त घोडे इथे येत असतात आणि त्यांचे गुण आणि मूल्य बघून थक्क व्हायला होते. यात्रेत विकल्या जणाऱ्या घोड्यांवर लाखो-करोडोंची बोली लागते. नुकतेच या यात्रेत महाराष्ट्रातील नाशिकचा एक घोडा मुख्य आकर्षण ठरला. ‘रावण’ नावाच्या या घोड्याची आहे. चर्चेचे कारण – रावण नावाच्या या काळ्या घोड्यासाठी यात्रेत 5 कोटी रुपयांची बोली लागली आहे. घोड्याला विकत घेण्यास अनेक जण तयार आहेत, पण दुसरीकडे मालकाने घोड्याला विकण्यास नकार दिला आहे.
रावण नावाच्या घोड्याचे शरीर काळ्या रंगाचे असून, त्याच्या कपाळावर पांढऱ्या रंगाच टिळा आहे. त्याच्या शरीरावर शुभलक्षणे असल्यामुळे घोड्याची किंमत कोट्यवधींच्या घरात असल्याचे मालक असद सयैद यांनी सांगितले. या घोड्याची लांबी 68 इंच असून, हा प्रामुख्याने प्रजननासाठी वापरला जातो.
रावणला दररोज 1 किलो तूप, 10 लिटर दूध, गावरान अंडी, बाजरी आणि बदाम काजू सारखे पदार्थ दिले जातात.
असद सय्यद यांचा हा घोडा विकण्याचा कोणताही विचार नाही. फक्त रावणला किती किंमत मिळते, हे जाणून घेण्यासाठी सारंगखेडच्या जत्रेत आणल्याचे त्यांनी सांगितले.