राजकारण

आमचे विमान; वादाचे नवे ‘उड्डाण’; फडणवीसांनी मिटवलेले भांडण पुन्हा सुुरु

Share Now

इंदापुरात भरणे की हर्षवर्धन पाटील हा वाद गेल्या दोन वर्षांपासून सुरूच आहे. लोकसभेला तो उफाळून आला, पण मध्येच देवेंद्र फडणवीस यांची इंट्री झाली आणि त्यांनी दोघांचे मनोमिलन घडवून आणले. त्यामुळे भाजपने सगळे काही विसरून अजितदादांचा म्हणजेच सुनेत्रा पवारांचा प्रचार केला. अर्थात तालुक्याचा आमदार अजितदादांच्या गटाचा व तालुक्याचा माजी आमदार भाजपचा म्हणजे महायुतीतलाच असूनही सुप्रिया सुळेंनी मात्र इथे चांगलीच बाजी मारली. या तालुक्यात भरघोस मताधिक्य घेतले आणि भाजपबरोबर राष्ट्रवादीची देखील कोंडी करून टाकली. पण सुंभ जळाला तरी पीळ जळत नाही म्हणतात. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील भाजप व राष्ट्रवादीच्या म्हणजेच पाटील व भरणे समर्थकांच्या अंगात जोर संचारला आहे.

हातरस च्या अपघातात, कुटुंबांच्या अनेक पिढ्या झाल्या उद्ध्वस्त

हर्षवर्धन पाटलांना विमानात बसून पाठवायचे की विमान चिन्ह द्यायचे हे लक्षात येत नसल्याने कार्यकर्त्यांनी विमानाचा फोटो फलकावर लावला. आम्ही २०२४ ला फिक्स असे दमदार फ्लेक्स इंदापुरात लावले. अर्थात एक तर इंदापूर वरून थेट विमानाने हर्षवर्धन पाटील मुंबईला जाणार की भाजपचे आणि आपले पटणार नाही म्हणून विमान हातात घेणार हे मात्र कार्यकर्त्यांनी गुलदस्तात ठेवले आहे. तसंही हर्षवर्धन पाटलांना बंडखोरीतच खूप मोठे यश आहे, अशी तालुक्यात चर्चा असते.

आता भाजपवाल्यांनी जोर लावला असेल, तर रुलिंग आमदार आहेत भरणेमामा. त्यामुळे भरणेमामांचे समर्थक कसे गप्प बसतील? जिथे भाजपच्या समर्थकांनी म्हणजे हर्षवर्धन पाटील समर्थकांनी फलक लावून २०२४ ला फिक्स असे म्हणत विमानाचे मोठे चिन्ह काढले आहे. त्याच्या शेजारी भरणे मामाच्या समर्थकांनी लागलीच एक बोर्ड आणून आपणच फिक्स आमदार असे लिहून हॅट्ट्रिक पूर्ण करूया अशी घोषणादेखील देऊन टाकली

गंमत म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत वरचे नेते सगळे एकत्र आणि त्यांच्यासाठी यापूर्वी डोके फोडाफोडी केलेले कार्यकर्ते स्वमग्न अशी काहीशी परिस्थिती होती. आता ही वरच्या नेत्यांना काही बोलण्याचा अवकाश, खाली कार्यकर्ता कोणाचीच वाट न पाहता थेट धुरळाच करतो. त्यामुळे नेत्यांना ही जपून शब्द वापरावे लागत आहेत. मात्र आता फ्लेक्स बोर्डच्या माध्यमातून भरणे पाटलांची जुगलबंदी वाढत जाणार की काय? अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *