सोशल मिडीयावर सामाजिक तेढ निर्माण करणारे मुंबई पोलिसांच्या रडारवर

सध्या राज्यासह देशातीस परिस्थिती पाहता समाजकटंकाकड़ून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतत, या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सक्रिय झाले आहे. मुंबईत जातीय वाद नियंत्रणात ठेवण्यासाठी सोशल मीडिया लॅब सक्रिय करण्यात आली असून. यामुळे आता सोशल मीडियाचा वापर करत सामाजित तेढ निर्माण करण्यांना चागलाच चाप बसणार आहे. मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबकडून आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत जातीय तेढ निर्माण करु शकणाऱ्या सुमारे ३000 पोस्ट डिलीट केल्या आहे.

हेही वाचा : धक्कादायक | खिचडीत मीठ जास्त झाले म्हणून पत्नीचा खून

रामनवमीपासून महाराष्ट्रात काही ठिकाणी हिंसाचार उसळत आहे. याप्रकरणी मुंबईत सहा गुन्हे दाखल झाले आहे. पहिला गुन्हा मानखुर्द पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. तसेच दुसरा गुन्हा मालवणी पोलीस ठाण्यात तर तिसरा गुन्हा कुरारा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. तसेच गोरेगावच्या आरे कॉलनीत एकूण तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : राज्यात भॊग्याबाबत मोठा निर्णय ? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

या प्रकरणी पोलिसांकडून मानखुर्द घटनेत आतापर्यंत ३० जणांना अटक करण्यात आली आहे. कुरार प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. गोरेगाव प्रकरणी २५ जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून सामाजिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी आतापर्यंत ६१ जणांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *