“ओमिक्रोन” नावाप्रमाणेच अवघड व्हेरिएंट !
नुकताच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या नवीन व्हेरियंट “ओमिक्रोन “या व्हेरियंट ला चिंतेचा प्रकार असल्याच सांगितलं. यूके आणि हाँगकाँगपासून इस्त्राईलपर्यंत अनेक देशांमध्ये हे आढळून आलं आहे. आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ही एक वेगाने विकसित होणारी परिस्थिती आहे.दक्षिण आफ्रिकेत “ओमिक्रोन ” चे २२ रुग्ण आढळून आल्यावर,तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की,’डेल्टा”व्हेरियंट ज्यामुळे दुसरी लाट आली, हा कोरोनाचा प्रकार त्या पेक्षाही सहा पटीने घातक असल्याचं सांगितलं. WHO च्या निष्कर्षांनुसार ज्या लोकांना पूर्वी COVID-१९ झाला आहे त्यांना ओमिक्रॉनमुळे पुन्हा संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.
या प्रकारात अनेक उत्परिवर्तन आहेत आणि ते व्हायरसच्या कार्यपद्धतीत मोठे बदल घडवून आणू शकतात. संस्थेनुसार जीनोमिक विश्लेषण चालू आहे आणि आणखी प्रकरणे समोर येऊ शकतात. ओमिक्रॉन प्रकार गेल्या चार दिवसांत 8 देशांमध्ये पोहोचला आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका, इस्रायल, इटली, हाँगकाँग, बोत्सवाना, बेल्जियम, जर्मनी, झेक प्रजासत्ताक आणि ब्रिटन मध्ये हा प्रकार सापडला आहे.