राजकारण

ओबीसी आरक्षणासाठी गुरुवारी मुंबईत मोर्चा

Share Now

ओबीसींच्या राजकीय आरक्षनाच्या मुद्दावर विरोधकांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना कारणीभूत ठरवलं आहे, सर्वोच न्यायालयाचा निकाल आणि आयोगाने काढलेला सुधारीत निवडणुकीच वेळापत्रक यामुळे आणखी राजकीय वातावरण तापलं आहे.
ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी मोर्चा काढणार असल्याचे सांगितले आहे.२३ डिसेंबर रोजी मोर्चा आहे. परंतु राज्यसरकार जमावबंदी लागू करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. मुंबईत जमावबंदी लावण्याचे कोणतेही सबळ कारण दिसत नाहीये. सरकार कायद्याचा दुरुपयोग करून जनतेचा आवाज दाबणार असेल तर सरकारचा जमावबंदी आदेश झुगारून आम्ही मोर्चा काढू’, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

ओबीसींच्या आरक्षणाबाबत केंद्र व राज्य सरकार दोन्हीकडून ओबीसींची फसवणूक केल्या जात आहे. जातीनिहाय जनगणनेशिवाय सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित इम्पिरिकल डाटा देता येणार नाही व दोन्ही सरकार या बाबतीत गंभीर दिसत नाही. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकारातून ओबीसींच्या न्यायिक मागण्यांसाठी २३ डिसेंबर रोजी राज्यव्यापी मोर्चा काढण्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारने मुंबईत जमावबंदी आदेश लागू केल्याने अधिवेशन काळात विविध मागण्यांसाठी होणाऱ्या आंदोलनाला रोखण्याचाच हा प्रयत्न असल्याची टीका आंबेडकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *