आता ट्विटर अकाऊंटच्या ब्लू टिकसाठी मोजावे लागतील ‘एवढे’ पैसे
टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतले आणि त्यामध्ये त्वरित बदल करण्यास सुरुवात केली. ट्विटरची मालकी मिळताच त्यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक सहकाऱ्यांची हकालपट्टी केली. यानंतर त्यांनी आता ट्विटरसंदर्भात आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे जर ट्विटर अकाऊंटपुढे ‘ब्लू टिक’ हवी असेल तर त्यासाठी प्रति महिना पैसे मोजावे लागणार आहेत.
सीडलेस काकडी: आता ‘सीडलेस काकडी’ वर्षातून 4 वेळा घ्या उत्पादन, ICAR चे नवीन वाण 45 दिवसांत देईल बंपर उत्पादन
ट्विटरवर ब्लू टिक असं म्हणजे अकाऊंट व्हेरिफाय आहे, असा त्याचा अर्थ आहे. यापूर्वी ट्विटर वापरकर्त्यांना ब्लू टिक मोफत मिळायचे. मात्र आता एलॉन मस्क हे ब्लू टिक साठी प्रति महिना शुल्क आकारण्याची योजना आखत आहे. व्हेरिफिकेशनसाठी ट्विटर वापरकर्त्यांना प्रति महिना वीस डॉलर एवढे शुल्क भरावे लागणार आहे. भारतीय रुपयाप्रमाणे अंदाजे १ हजार ६४० रुपयापर्यंत ब्लू टिक प्रतिमहिना साठी रक्कम मोजावी लागणार आहेत. सर्व ट्विटर वापरकर्त्यांना ब्लू टिक मिळत नाही. ब्लू टिक असणारी ट्विटर खाती ही सहसा ख्यातनाम व्यक्तींची असतात. त्यामुळे ब्लू टीकेचे महत्व जास्त आहे.
नोव्हेंबरमध्ये बँका 10 दिवस राहतील बंद, पहा संपूर्ण यादी
दरम्यान, ट्विटर मुख्यालयात पोहोचल्यानंतर मस्क यांनी ‘the bird is freed’ असं ट्विट केलं होतं. यावरुन आगामी काळात ट्विटरमध्ये मस्क हे मोठे बदल करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एलॉन मस्क यांचा ट्विटरच्या मुख्यालयातील प्रवेशसुद्धा हटके होता. ते हातात सिंक घेऊन मुख्यालयात फिरत होते. त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावर ‘लेट दॅट सिंक इन! असं म्हणत याचा व्हिडीओ शेअर केला होता.