क्राईम बिट

मनासारखी बायको मिळाली नसल्याने ; नवविवाहित तरुणाने केली आत्महत्या

Share Now

मनासारखी बायको मिळाली नसल्याने नाराज असलेल्या औरंगाबादयेथील नवविवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणानं व्हॉट्सअपवर ‘आय क्वीट’ असे स्टेटस् ठेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील मुकुंदवाडी परिसरातील राजनगर येथे समोर आली आहे.

अजय समाधान साबळे या २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे . तसेच बायकोच्या काही सवयी त्याला पटत नव्हत्या तर बायकोला साडी नेसता येत नसल्याचा उल्लेख सुध्दा सुसाईड नोटमध्ये केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजनगर भागात आई-वडिलांनासोबत राहणारा अजय प्लंम्बरच काम करून घर चालवत होता. पाच महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. तर काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती. रविवारी रात्री ९. ३०च्या सुमारास त्याने आपल्या मोबाईलवर ‘आय क्वीट’ असे स्टेटस् ठेवले . त्यामुळे हे स्टेट्स पाहून त्याचा एक मित्र त्याला घरी भेटायला आला. तो त्याच्या खोलीत गेला असता अजयने गळफास घेतल्याचं त्याला दिसले . त्यानंतर तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी अजयला रुग्णालयात हलवले,पण डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे घर बेकायदेशीर नारायण राणेंचा दावा

सुसाईड नोटमध्ये काय लिहलंय …
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे , अजयने गळफास घेतलेल्या खोलीत एक सुसाईड नोट पोलिसांना सापडली . यात त्याने लिहिले आहे की, मनासारखी बायको मिळाली नाही, तिला साडी नेसता येत नाही, स्वयंपाक करता येत नाही, एवढेच नव्हे तर हॉटेलमध्ये जेवायला नेले तर तिथेही ती जेवणानंतर स्वतःच्या जेवणाची थाळी उचलून दुसरीकडे ठेवते,असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. मात्र या चिठ्ठीतील हस्ताक्षर त्याचेच आहे का, हे तपासणीसाठी पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आत्महत्या करण्याआधी वेगवेगळी कारणं आपण ऐकत असतो मात्र बायकोला साडी नेसता न येण्यामुळं आत्महत्या केलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे

हेही वाचा :- सेंद्रिय शेती, माहिती संपूर्ण वाचून समजून घ्या आणि शेअर नक्की करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *