नियमांच उल्लंघन कराल तर कारवाईला सामोरे जाल

सध्या कोरोना रुग्णाची वाढती रुग्ण संख्या बघता राज्य तिसऱ्या लाटेच्या वाटचालीकडे वाटचाल करत आहे. या वाढत्या रुग्ण संख्येला केवळ होणारी नागरिकांची गर्दी आहे ,यामुळे  नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर पोलीस आणि प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिले जाईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

गुरुवारी राज्यात ३६२६५ कोरोनाबाधिता रुग्णाची वाढ झाली. मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित आढळत आहेत. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली जात असून . त्यामुळे निर्बंधही वाढण्याची दाट शक्यता आहे. मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, अनावश्यक गोष्टी मुळे संसर्ग वाढत असल्याचे लक्षात आल्यास पुढील काही कालावधीमध्ये निर्बंध वाढवण्याचा विचार केला जाऊ शकतो. याबाबत मुख्यमंत्री घोषणा करू शकतात.

रुग्णालयात भरती होण्याचे तसेच ऑक्सिजन वापराचे प्रमाण वाढले नाही हि बाब दिलासादायक आहे. . त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. मात्र या कोरोनाच्या प्रादुर्भावापासून लस वाचवू शकते . त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यायला हवं, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.

पुणे, मुंबई तसेच ठाणेमधील पॉझिटिव्हीटी रेट तसेच ओमायक्रोनचा वेग पाहता तेथील शाळा बंद करण्याचा निर्णय झाला आहे. तर, इतर जिल्ह्यात मात्र अशी परिस्थिती नाही त्यामुळे त्या ठिकाणी शाळा बंद करण्याचा लगेचच निर्णय होणार नसल्याचेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *