दिशा सालियान प्रकरणी नीतेश राणे यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

सुशांतसिंग राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणावरून नारायण राणेंनी गंभीर आरोप केले होते. यामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला.

मुंबईच्या महापौर किशोरी पेंडणेकर यांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहलं आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी सकाळी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी दिशा सालियान मृत्यूप्रकरण आणि सचिन वाझेचं कनेक्शन आहे का? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.

दिशा सालियान प्रकरणात मालवणी पोलिसांची भूमिका पहिल्या दिवसापासून संशयास्पद दिसून येत आहे. आता त्यांना याप्रकरणी अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. आठ जूनच्या रात्री उपस्थित असलेला आणि दिशासोबत असलेला रोहन रॉय सर्वांसमोर येऊन का बोलत नाही? दिशाला ज्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमधून मालाडला नेण्यात आले ती कार सचिन वाझेची आहे का? असा सवाल नितेश राणेंनी केला आहे.

मुंबईच्या महापौरांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहिलं. त्यावरून देखील नितेश राणे यांनी टीका केली आहे. मुंबईच्या महापौरांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहिलं. त्यानंतर आयोगानं मालवणी पोलिसांनी अहवाल सादर करण्यास सांगितला. यावरून ८ जूनच्या रात्री काहीच घडलं नाही, असं दाखवून हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, असं करून ते स्वतःसाठीच खड्डा तयार करत आहेत, असंही नितेश राणे म्हणाले.

दिशाला ८ जूनच्या रात्री काळ्या मर्सिडीजमधून तिच्या मालाडच्या घरी नेण्यात आले. सचिन वाझेकडे देखील अशीच मर्सिडीज कार आहे, जी सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. या दोन्ही प्रकरणात वापरलेली कार एकच आहे का ? ९ जूनला सचिन वाझेला पोलिस दलात पुन्हा रुजू करण्यात आले. त्यामुळे सचिन वाझे आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचं काही कनेक्शन आहे का ? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. मालवणी पोलिसांनी निष्पक्ष तपास न केल्याने प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले आहे आणि आता त्याच पोलिस ठाण्याला राज्य महिला आयोगाने अहवाल सादर करण्यास सांगितले? ते कितपत योग्य आहे? हे कोणाला वाचण्याचा प्रयत्न करत आहे? असं नीतेश राणे म्हणाले

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *