नितेश राणेना सहकार विभागाचा झटका – जिल्हा बँक निवडणुकीत मतदानाचा हक्क नाकारला
भाजप आमदार नितेश राणे यांनी संतोष परब यांचावर हल्ला केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे, संतोष परब यांनी नितेश राणे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यामुळे त्यांना अटक होणार की अटकपूर्व जामीन मिळणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे, त्यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सहकार विभागाने नितेश राणे यांच्यावर कारवाई केली आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी आज मतदान आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येलाच भाजप प्रणित पॅनलला मोठा धक्का सहकार विभागाने दिला आहे. या निवडणुकीसाठी आमदार नितेश राणे यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला आहे. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाने जिल्हा बँकेकडून १६ कोटी रुपये कर्ज घेतले होते. हे कर्ज थकीत असल्यामुळे सहकार विभागाने नितेश राणे यांचा मतदानाचा हक्क नाकारण्यात आला आहे.