नितेश राणेंना अटक की अटकपूर्व जामीन.? आज होणार सुनावणी

आमदार नितेश राणे यांना अटक होणार की अटकपूर्व जामीन मिळणार यावर आज निर्णय होणार आहे. नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्या पासून नितेश राणे नॉट रीचेबल आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक होणार आहे , त्याचबरोबर शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. यावर संतोष परब यांनी फिर्याद दाखल केली आहे.या हल्ल्याप्रकरणी पोलीसांनी ५ आरोपींना अटक केली. त्यातला एक आरोपी हा नीतेश राणें यांच्या स्वाभिमानी पक्षाचा पुण्यातील कार्यकर्ता असल्याची माहिती मिळतेय. हा हल्ला नीतेश राणे आणि गोट्या सावंत ह्या दोघांच्या सांगण्यावरुन केल्याचा आरोप फिर्यादी संतोष परब यांनी केलेला आहे.

या प्रकरणी नितेश राणे यांच्या बाजूने स्पष्टीकरण देण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती, संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यात नितेश राणेंचा काहीही संबंध नाही. त्यांचं नाव या प्रकरणात गोवलं जात आहे. निवडणूक संपेपर्यंत त्यांना डांबून ठेवण्याचा डाव आहे. ३०७ कलम या गुन्ह्यात लावलं आहे. मेंदू, हृदय आणि डोक्याला मार लागला तर हे कलम लावलं जातं. कारण या भागांवर लागलं तर मृत्यू होता. मात्र या प्रकरणात फक्त खरचटलं आहे. तरीही ३०७ कलम लावलं आहे, असं ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *