नितेश राणें आणि मंत्री नवाब मलिक यांच्यात खालच्या पातळीवर ट्विटर ‘वार’
आज काल राजकीय टीकाकारांनी आपली पातळी सोडली आहे , याच दररोज एक उदाहरण जनतेसमोर येत असत, दोन दिवस आधी नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना बघून म्याव म्याव च्या घोषणा दिल्या होत्या, याला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संयमाने उत्तर दिले.
आज सकाळी पुन्हा नीतेश राणेने एक फोटो ट्वीटरवर पोस्ट करून नवाब मलिक यांच्यावर टीका केली, त्यावर नवाब मलिक यांनी देखील एक फोटो पोस्ट केला आहे. यातुन महाराष्ट्रातील राजकीय पातळी किती खालच्या थराला गेली आहे, याच दर्शन होत.
सोशल मीडियावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि नितेश राणे यांच्या ट्विटची चर्चा आहे.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी एका कोंबडीला मांजरीचा चेहरा मॉर्फ करून फोटो ट्विट केला आणि त्याला पेहचान कौन असं शीर्षक दिलं.
पैहचान कौन ? pic.twitter.com/zNCdvKazH8
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 24, 2021
आज नितेश राणेंनी देखील मॉर्फ डुकराचा फोटो ट्विट केला आहे. आणि ही प्रजाती फक्त भंगारात आढळते असा मजकूर त्याला जोडलाय.
ही प्रजाती फक्त भंगारात आढळते..
ओळखा पाहू कोण? pic.twitter.com/eoZzy7smAR— nitesh rane (@NiteshNRane) December 25, 2021