क्राईम बिट

राज्यात फिल्मी स्टाईल ड्रग्स तस्करी ‘या’ शहरात, नायजेरियन आणि केनियन आरोपी ताब्यात

Share Now

दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये, मुंबईत महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) यांनी एका नायजेरियन आणि एका केनियन नागरिकांना त्यांच्या शरीरात एकत्रितपणे १० कोटी रुपयांचे ड्रग्ज बाळगल्याबद्दल अटक केली आहे.

पहिल्या प्रकरणात, डीआयआरने ६ एप्रिल रोजी आदिस अबाबाहून आलेला केनियाचा नागरिक ओदौल ओचीए याला अटक केली. डीआयआर कडे त्याच्याबद्दल विशिष्ट माहिती असल्याने, अधिकार्‍यांनी एक्स रे करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागितली होती. ज्यामुळे त्यांच्या संशयाची पुष्टी झाली. त्याला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी ९९० ग्रॅम वजनाच्या आणि ५ कोटी रुपयांच्या कोकेनच्या १०० गोळ्या काढल्या, असे विशेष सरकारी वकील आर के पाठक यांनी सांगितले.

हे हि वाचा धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आलाच नाही ; अजित पवार यांनी दिली महत्वाची माहिती

दुसर्‍या घटनेत, हवाई गुप्तचर विभागने नायजेरियन नागरिक रोनाल्ड बासिरिगर याला १.३ किलो वजनाच्या आणि साडे चार कोटी रुपये किमतीच्या सुमारे १०० हेरॉइनच्या गोळ्यांसह ताब्यात घेतले. दोघांवर अंमली पदार्थ आणि अमली पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *