राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षावर सुनेला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

बीडमध्ये मानलेल्या आईच्या सांगण्यावरून बायकोला मारहाण करण्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्याची अंबाजोगाई शहरात ही घटना घडली असून संगीता तूपसागर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगीता तूपसागर या राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्ष आहेत. त्याच्यासह भुजंग भुतावले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे बीडच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मानलेल्या आईच्या सांगण्यावरून बायकोला मारहाण करण्याप्रकरणी घडलेला प्रकार अंबाजोगाई शहरात समोर आला. संगीता तूपसागर या पिडीतेच्या मानलेल्या सासु असून, यांच्याकडे बीड महिला जिल्हाध्यक्षपद असल्याने बीडच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणाचा पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलिस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *