Uncategorized

‘अति महत्वपूर्ण व्यक्ती’ म्हणून नवनीत राणा यांना दर्जा, केंद्राने दिली वाय प्लस सुरक्षा

Share Now

महाविकास आघाडी सरकारवर विविध मुदद्यांवरुन निशाणा साधणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने वाय प्लस सुरक्षा प्रदान केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार राणा यांना वाय प्लस सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्यानंतर नवनीत राणा यांच्यासाठी वाय प्लस श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे आता खासदार नवनीत राणा यांना देशात कुठेही फिरतांना वाय प्लस दर्जाचे सुरक्षा कवच असणार आहे. विशेष म्हणजे नवनीत राणा यांचा देशाच्या म्हणजेच अति महत्वाच्या व्यक्तींमध्ये समावेश झाला आहे.

केंद्र सरकारने प्रदान केलेल्या या सुरक्षा व्यवस्थेत एसपीओ, एनएसजीचे कमांडो, सीएसएफ चे बंदूकधारी जवान, शासकीय पायलट कार, दोन स्कॉर्पिओ गाड्या आदी ताफा पुरविण्यात येणार आहे. आता २४ तास हे सुरक्षा पथक खासदार नवनीत राणा यांच्या समवेत राहणार आहे.

नवनीत राणा या सातत्याने लोकसभेत राज्य सरकारच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे काढतात. देशातील अनेक गंभीर प्रश्नांना वाचा फोडतात. सोबतच अनेक ज्वलंत मुद्द्यांना हात घालतात. त्यामुळे त्यांचा जीवाला धोका असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने गृहमंत्रालयाला दिला होता त्याची गांभीर्याने दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार नवनीत राणा यांच्या सुरक्षेसाठी ही वाय प्लस सुरक्षा यंत्रणा प्रदान करण्याचे निर्देश दिले. याच अनुषंगाने खासदार नवनीत राणा यांचे हे वाय प्लस सुरक्षा पथक आज दुपारी अमरावतीत दाखल होत आहे, ज्यामध्ये एकूण 11 कमांडो असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *