राष्ट्रवादी युवा काँग्रेस कडून मोदींचा वाढदिवस साजरा
बीड : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने बीडमध्ये राष्ट्रवादी कडून उपहासात्मक आंदोलन करण्यात आल, येवेळी त्यांनी केक देखील कापला. नरेंद्र मोदी यांनी जनतेला ‘एप्रिल फुल’ केले आहे त्यांनी म्हंटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा देशातील जनतेसाठी मोठा एप्रिल फुल आहे, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला. बीडमध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच यानिमित्त केकही कापला. त्यानंतर तो केक या कार्यकर्त्यांनी आपापसात वाटून खाल्ला.
या आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले, ‘ या लबाड माणसाचा वाढदिवस आम्ही एप्रिल फुलचे औचित्य साधून करत आहोत. पंतप्रधान साहेबांनी युवकांची फसवणूक , जनतेची, महिलांची फसवणूक केली आहे. हा एकपात्री अभिनय करून दिशाभूल करून ते आज सत्तेवरती आहेत. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. याच उद्देशाने आम्ही बीड जिल्ह्यात त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत.