Uncategorized

वैजापूर येथे शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

Share Now

वैजापूर: प्रतिनिधी
येथील जिल्हा व अपर सत्र न्यायालयात शनिवार दि. १२ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या राष्ट्रीय लोक अदालतीत दिवाणी, फौजदारी, चलनक्षम दस्तऐवज, मोटार अपघात, जमीन अधिग्रहण, विद्युत प्रकरणे तसेच इतर स्वरूपांचे प्रलंबित व वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहे. तरी या लोक अदालतीचा जास्तीत-जास्त लोकांनी लाभ घ्यावा व आपले प्रकरणे सामोपचाराने मिटवावे असे आवाहन आपला कायदा शक्ती जनसेवा संघाच्या वतीने ॲड. आकाश ठोळे, इफ्तेखार शेख, इम्रान खान, संतोष गावडे, एस आर बत्तीसे, एसएम जेजुरकर, एसएस मगर, प्रदीप बत्तासे, एसबी कटारे, रमेश सावंत, एकनाथ कुंजीर, एमआर शेख, अशोक सोनवणे, सईद अली, केएन हरिदास, अंकित मालपाणी, श्रेणिक कोठारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *