महाराष्ट्रराजकारण

पंतप्रधान मोदींवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण

Share Now

भंडारा : जिल्ह्यात काल जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात निसटता पाय मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या. काल संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचार सभे दरम्यान नाना पटोले यांनी ‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे वक्तव्य केले आहे. असा व्हिडिओ भंडारा जिल्ह्यात वायरल होत आहे.

त्यावर त्यांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत म्हंटले आहे, “माझ्या मतदारसंघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या असता मी त्यांच्याशी बोलतानाचा व्हिडीओ खोडसाळपणे सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. मी पुन्हा स्पष्ट करतो मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही,तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो.” असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *