नागाला मारल्याचा नागिणीने घेतला बदला ; १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
आपल्या घरातील वृद्ध व्यक्तीकडून बऱ्याच वेळा आपण ऐकले असेल कि नाग- नागीण या पैकी एकाला हि मारले कि त्यापैकी एक बदला घेतो. मध्य प्रदेश येथील सिहोरमध्येही अशी घटना घडली आहे, याला नागाचा सूड म्हटले जात आहे. मुळात सर्पदंशामुळे १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.
ही घटना सिहोर जिल्ह्यातील बुधनी तालुक्यातील जोशीपुरा येथील आहे. येथे राहणारे ग्रामस्थ किशोरी लाल यांच्या घरात गुरुवारी साप बाहेर आला. कुटुंबातील लोकांनी मिळून या सापाला मारले. हा सर्व प्रकार घडताच कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, याला योगायोग म्हणा की २४ तासांच्या आत रात्रीच्या वेळी एका नागाने घरात घुसून किशोरी लाल यांचा १२ वर्षांचा मुलगा रोहितला दंश दिला. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे .
हे हि वाचा :- घृणास्पत ! लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तरुणीची विष पाजून हत्या
सर्पदंश झाल्यानंतर कुटुंबीयांनी रोहितला तातडीने होशंगाबाद जिल्हा रुग्णालयात नेले. तेथून त्यांना भोपाळला पाठविण्यात आले. कुटुंबीय मुलासह भोपाळला जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू असून. मृत्यू झाल्यानंतर त्याचे पीएम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मुलाच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांना रात्री नाग सापडला आणि त्यालाही मारले. गावकर्यांकडून या घटनेला नागाच्या सूडाशी जोडले जात असून. नागाने बदला घेतल्याची चर्चा संपूर्ण परिसरात आहे.
हेही वाचा :- औरंगाबाद जिल्ह्यात खळबळ ; ४८ वर्षीय महाराजांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल